‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......

‘दरम्यानचे प्रक्षोभ’ : सामान्य माणसाची संभ्रमावस्था, परिस्थितीशरणता आणि सामान्य माणसाच्या जगण्याची अजिबात चाड नसलेलं अनैतिक आचरण यांची अभिव्यक्ती

कवी धर्म, जात, भाषा, प्रांत या सर्वसामान्य माणसांत फूट पाडणाऱ्या आणि माणसातलं माणूसपण हिरावून घेणाऱ्या बाबींवर अनेकदा टीका करतो. प्रतीकांच्या आहारी जाऊन समाजातले घटक आपापसांत झगडत राहतात, म्हणून कवीला ‘वर्तमान हा प्रतीकांच्या खुंटीला अडकून ठेवलाय’ असं वाटतं. कवी खिन्न करणारं सामाजिक-राजकीय वास्तव या सगळ्यामुळे अंततः कोणताही कडवटपणा स्वतःच्या स्वभावात शिरणार नाही, याची दक्षता घेत लिहितो.......

‘चिनभिन’ : बांदेकरांच्या कविता बाहेरच्या काळोख पसरलेल्या वातावरणाची यथायोग्य जाणीव करून देतात आणि त्याच्या व्यक्तीवर होत असलेल्या परिणामांकडेही निर्देश करतात

प्रसिद्ध हिंदी कवी विष्णु खरे म्हणाले होते, “चांगल्या कवितेत माणसाच्या अस्तित्वासमोर उभ्या ठाकलेल्या सर्व संकटांविषयी चिंता, ती व्यक्त करताना आवश्यक असलेली बांधिलकी, सगळ्या मानवजातीच्या रोमांचक व्यवहारांत खोल रुची, आयुष्य आणि नातेसंबंध यांतल्या विविधतेप्रति असणारी उत्सुकता, आणि हे सगळं आपल्या भाषा आणि शैलीत मांडण्याची क्षमता हे गुण आढळायला हवेत.” बांदेकर यांच्या या संग्रहातील सगळ्या कवितांत हे गुण आढळतात.......

हे लेखन वैचारिक गटबाजीच्या क्षुद्र राजकारणाला बळी न पडता, परिवर्तनाचं चक्र गतिमान करण्यात थोडाफार तरी हातभार लावता यावा, अशी प्रामाणिक आकांक्षा बाळगून केलेलं आहे!

धसकटे यांना शाहू-फुले-विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबरच भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे विचारही आजच्या हिंस्र, क्रूर, भेदाभेदांनी भरलेल्या काळात चिरकाल शांतता नांदण्यासाठी आवश्यक वाटतात. यासाठी ते फुले-आंबेडकरी विचारप्रवाहांचा आढावा घेऊन त्यांतील आताच्या काळाला जरुरीच्या त्या गोष्टी स्वीकारण्यासोबतच काही गोष्टींची नव्यानं भर घालायला हवी, हे सांगतात.......

नरेंद्र लांजेवार : “सकस वाचनामुळे कोणताही एकांगी, टोकाचा अतिरेकी विचार न करता, भावनाविवश न होता, विवेकी, सारासार बुद्धीचा, उदारमतवादी दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मदत होते.”

मी कोणत्याच मंदिरात दर्शनाला जात नाही. परंतु पुस्तकांच्या दुकानात अवश्य जातो. चार-दोन पुस्तकं विकत आणतो. माझ्या लहान मुलीला माहिती असते बाबा बाहेरगावी गेले ते पुस्तकच आणणार... आजवर जवळपास वीसपेक्षा जास्त ग्रंथालयांना पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत. शक्यतोवर एका वेळेस शंभरपेक्षा जास्तच पुस्तकं भेट दिलीत. मी घरी गमतीनं म्हणतो, मी मेल्यावर माझ्या ग्रंथसंग्रहाचा जाहीर लिलाव करा, घरावरील सर्व कर्ज सहज फेडलं जाईल.......